नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुना मोंढा भागातील माँ आरबुद ट्रेडिंग ऑफिस’ येथे घडलेल्या गुन्ह्याचा तपास वजीराबाद पोलिसांनी यशस्वीरीत्या केला आहे. या प्रकरणी सोहनलाल मोतीलालजी परमार (वय ४० वर्ष, रा. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपशील: ही घटना ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी १ एप्रिल २०२६ रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३०९(४), ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून तो उघडकीस आणला आहे.हा गुन्हा किशन कुरील वय २२ रा. गायत्री मंदिर जवळ नांदेड याने केला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनील बुलंगे हे करीत आहेत. या प्रकरणात १० लाख ५० हजार रुपये बळजबरी चोरून नेण्यात आले होते. या चोरट्याला आज न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
तपास करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार: हा तपास पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कारवाईत प्रत्यक्ष सहभागी असलेले वजीराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी खालीलप्रमाणे आहेत:
- श्री. अजित कुंभार (पोलीस निरीक्षक, वजीराबाद पोलीस ठाणे)
- श्री. सुनील बुलंगे (पोलीस उपनिरीक्षक, वजीराबाद पोलीस ठाणे)
- पोहेकॉ/१२१८ शिवसांब मठपती
- पोहेकॉ/२५४३ हबीब चाऊस
- पोकॉ/१५४ संतोष पोकले
- पोकॉ/१९३४ संतोष पावडे
- पोकॉ/३०८० विलास कदम
- पोकॉ/१४ भाऊसाहेब राठोड
- पोकॉ/४६७ जसविंदरसिंग चिमा
