चौफाळा परिसरात युवकावर जीवघेणा हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)-चौफाळा भागातील पाण्याच्या टाकीजवळ काल रात्री सुमारे 7.30 वाजेच्या दरम्यान एका 25 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, गजानन रमेश बुरडे (वय 25) यांच्यावर आनंद सूर्यवंशी (वय 27) याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यात गजानन बुरडे यांच्या मानेजवळ गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन बुरडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हल्ला करणारा आनंद सूर्यवंशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!