नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम बापाने आपल्या अडीच वर्षाच्या जन्मदिलेल्या लेकवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. फक्त गुन्हे दाखल झाले आणि पत्रकारांनी बातम्या लिहिल्या तर हा प्रकार बदलणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाने या संदर्भाचा विचार करण्याची गरज आहे. तरच हे प्रकार थांबतील आणि म्हणूनच आजच्या काळाला कलयुग असे नाव दिलेले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका आईने आपल्या अडीच वर्षाच्या बालिकेवर तिच्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे. लैंगिक अत्याचारातील शब्द लिहिण्याची आमची सुध्दा ताकत नाही. कारण अडचीण वर्षाची बालिका काय असते, तिला कसे सांभाळावे लागते. ही आम्ही सुध्दा पाहिलेले आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब ज्याच्या आई-वडीलांनी आपल्या बालकांना सुसंस्कार दिले नसतील अशाच घाणेरड्या औलादी असे प्रकार घडवितात.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या संदर्भाचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलीस आलेल्या तक्रारीप्रमाणे काम करतातच. आता ती तक्रार आणि त्यातील सत्यता शोधणे हे पोलीसांचे काम आहे. परंतू हे घटना सत्यच असेल तर समग्रस्तरावर यावर विचार होण्याची गरज आहे. फक्त शब्द लिहुन, बातमीच्या माध्यमाने खळबळ माजवून, बातमीच्या माध्यमाने काही खंडणी घेण्याची तयारी दाखवण्यापेक्षा पत्रकारांनी आपले सत्य काम केले पाहिजे. आम्ही सत्य जनतेसमोर मांडले आहे. आणि हेच पत्रकारांचे काम आहे आणि तेच आम्ही केले आहे. यावर विचार करण्याची गरज संपूर्ण समाजाची आहे. पोलीस आलेल्या तक्रारीची निर्गती करण्यात स्वतःला धन्य मानतात. पण काही पोलीस असे सुध्दा आहेत की, समाजाची तक्रार ऐकूण घेण्यासाठी समाजाला वेळ सुध्दा देतात.
