राज्य शासनाने 14 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या

श्रीकृष्ण कोकाटे नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या बदल्यांसाठी सुगीचा काळ आहे. त्यात महाराष्ट्र शासनाने 14 आयपीएस अधिकार्‍यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहे. काही जणांच्या 21 मे रोजी केलेल्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन ठिकाणी पदस्थापना दिली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) कडून स्थगिती मिळवलेले हिंगोलीचे आणि नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक यांना नांदेड येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पदस्थापना दिली आहे.
बदल्या करण्यात आलेली अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. अरविंद चावरीया-प्रतिक्षेत (पोलीस उपमहानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल गट मुंबई), विनिता साहू यांची बदली पोलीस उपमहानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल गट मुंबई येथे झाली होती. त्यांना ती बदली बदलून अपर पोलीस आयुक्त नागपुर शहर येथे पाठविले आहे. सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील अरविंद साळवे यांना पोलीस उपमहानिरिक्षक दहवाद विरोधी पथक मुंबई येथे बदली दिली आहे. सागरी सुरक्षा राज्य गुप्तवार्ता विभाग येथे बदली झालेले श्रीकांत परोपकारी यांना पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. हिंगोली येथे असतांना बदली झाल्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. पण येथे तात्पुर्ती स्थगिती मिळाली पण अंतिम निर्णय काही आला नाही. या सर्व प्रकाराला सदसद विवेक बुध्दीने विचार करून श्रीकृष्ण कोकाटे यांनी मॅटमधील आपले प्रकरण मागे घेतले. त्यानंतर आता राज्य शासनाने त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे बदली दिली आहे.
नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांना पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग येथे बदली दिली आहे. 21 मे रोजी बदली करण्यात आलेले अमरसिंह जाधव यांना पोलीस उपआयुक्त ठाणे शहर येथे नियुक्ती दिली आहे. अशाच प्रकारचे दुसरे अधिकारी अमोल झेंेडे यांना पोलीस अधिक्षक पी.एम.आर.डी.ए. पुणे येथे नियुक्ती दिली आहे. तसेच तिसरे अधिकारी निलेश सोनावणे यांना पोलीस उपआयुक्त वायरलेस कोस्टल डिव्हिजन नवीमुंबई येथे बदली दिली आहे. पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक ठाणे येथील रुपाली अंभुरे यांना पोलीस अधिक्षक डायल 112 नवी मुंबई येथे बदली दिली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथील समादेशक स्वाती भोर यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र तासगाव सांगली येथे प्राचार्य पदावर पाठविले आहे. बृहन्मुंबई येथील पोलीस उपआयुक्त कविता मेरकर यांना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर येथे समादेशक पदावर पाठविले आहे. पोलीस अधिक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील वैशाली माने यांना पोलीस उपआयुक्त मिरा भाईंदर वसई विरार येथे नियुक्ती दिली आहे. गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!