नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने भदंत पंय्याबोधी थेरो यांना निवडपत्र देण्यात आले असून नवीन नांदेडातील सिडको येथे दि. २६ जून २०२६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फोर्सच्या वतीने देण्यात आली. फुले आंबेडकरी चळवळीसह धम्म चळवळीत अग्रेसर असलेल्या भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सदरील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी डॉ. सुजाता पोहरे, डी. एस. वाघमारे, बा. रा. वाघमारे, यांची उपस्थिती होती. भदंत पंय्याबोधी थेरो यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे धम्म चळवळीसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याबद्दल साधूवाद व्यक्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 776 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ईरान का मार्को रुबियो को सभ्यता वाला तंज नांदेडमध्ये प्रिगॅबॅलिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कारवाई