स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड; १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त हिमायतनगर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने हिमायतनगर शहरात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल आठ जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या कारवाईत ८२ हजार ६०० रुपये रोख रक्कम, दोन स्कुटींसह एकूण १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये काही मोठे व्यापारी तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील आयटीआयच्या पाठीमागील शेत परिसरात काहीजण मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोगरे व पोलीस उपनिरीक्षक पुयड यांच्या पथकाने मध्यरात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम, दोन स्कुटी व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी संबंधितांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे हिमायतनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये नामांकित व्यापारी व काही राजकीय व्यक्ती असल्याची चर्चा जोर धरत आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे Kanthak Suryatal Post Views: 712 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कॉकरोच पार्टीचा हा क्रांतिकारी जाहीरनामा वाचा आणि थरथरा! मेलोनी ने मेलोडी की मिठास को भूल कर भारत के तीन जहाज जप्त किये