नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीसाठी जनावरे ठेवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ६२ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण १८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुकरामाबाद आणि इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुकरामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत परतपूर (ता. मुखेड) येथे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईत रफीक गौससाब कुरेशी (वय ४५), अमजद शिकुरसाब कुरेशी (वय ३२) आणि उस्मान शिकुरसाब कुरेशी (वय ३५, सर्व रा. मुकरामाबाद, ता. मुखेड) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी येथे ४४ गोवंश जनावरे जप्त केली असून त्यांची किंमत ११ लाख ८५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेहमतनगर परिसरात मोहम्मदिया मशिदीजवळील एका बंद घरावर छापा टाकून १८ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. या प्रकरणात गय्यूर कुरेशी शेख रहीम (वय ५२, रा. रेहमतनगर, इतवारा, नांदेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त जनावरांची किंमत ६ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर आळा घालण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे समन्वय साधत ही यशस्वी कारवाई केली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, रमेश गायकवाड तसेच संबंधित पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 745 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची भव्य मोटारसायकल रॅली काही दिवसांपूर्वी केलेल्या काही आयपीएस बदल्यांमध्ये बदल करून नवीन जागा दिल्या;काहींना नवीन नियुक्त्या