नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा रात्रगस्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकाने आज मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास इंजिनिअरींग कॉलेज रस्त्यावर विष्णुपूरी येथे एक टिपर पकडला. त्याच्याकडे योग्य कागदपत्र नव्हती आणि रात्रीच्यावेळी वाळू वाहतुक प्रतिबंधक असतांना सुध्दा तो वाळू वाहतूक करत होतो. म्हणून ती टिपर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.अद्या वृत्तलिहिपर्यंत या टिपर काही कार्यवाही झालेली नव्हती. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षकावर वेगवेगळ्या प्रकारे बरेच दबावतंत्र वापरण्यात आले. पण त्यांनी ते सर्व झुगारुन त्या टिपरला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उभे केले. दि.20 मे रोजी 03.51 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरी क्रमांक 3 वर असलेल्या नोंदीप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप थडवे आणि चालक दत्ता पवार हे जिल्हा रात्रगस्त पेट्रोलिंग ड्युटीवर होते. ते 2.15 वाजा इंजिनिअरींग कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर विष्णुपूरी येथे आले असतांना त्यांनी टिपर क्रमांक 04 सी.जी.2532 ला थांबवले. ही गाडी माधव तुकाराम गोडबोले (60) रा.हडको हे चालवत होते. त्यांच्याकडे कोणताही रॉयल्टी परवाना नव्हता. सोबतच सुर्यास्त ते सुर्योदय या कायद्याप्रमाणे वाळू वाहतुक प्रतिबंध आहे. तेंव्हा त्यांनी ही टिपर गाडी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. हा टिपर पकडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप थडवे यांच्यावर अनेक दबाव आणण्यात आले अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण त्या दबांना झुगारुन थडवे यांनी या टिपरविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी ती गाडी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उभी केली आहे. वृत्तलिहिण्याअगोदर या टिपरवर कार्यवाही झाली काय याची विचारणा केली असता ती अद्याप झालेली नव्हती. Kanthak Suryatal Post Views: 1,251 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नार्वे की लेडी पत्रकारने मचाया हंगामा;उसको किलो से गालियां;पर उसके समर्थकों की भीड़ बड़ी खा. इकरा हसन म्हणाल्या मला गोळी मारा