अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहिम; 53 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त नांदेड, प्रतिनिधी (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत किनवट शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 31 मे 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या 16 व्या दिवशी किनवट पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर, गोकुंदा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सुमारे 3 लाख 88 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच मोहिमेदरम्यान अवैध गुटखा विक्री प्रकरणी 2 जणांविरुद्ध कारवाई करत 1 लाख 8 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका-जुगार प्रकरणी 33 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 लाख 86 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दरम्यान, अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी व्यापक कारवाई करत 79 आरोपींवर 78 गुन्हे दाखल केले. या कारवाईत 8 लाख 4 हजार 246 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा प्रकरणी 2 गुन्हे नोंदवून 30 लाख 15 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. शस्त्र अधिनियम, कोटपा कायदा व इतर कायद्यांअंतर्गत मिळून एकूण 103 कारवाया करण्यात आल्या असून आरोपींकडून एकूण 53 लाख 93 हजार 112 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.नागरिकांनी परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस विभागाने खबर हेल्पलाइन (मो. 9150100100) सुरू केली असून फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 607 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation योगी आदित्यनाथचे पंख कापण्याची तयारी पाहून शिस्त अणि संस्कार हरवल्या सारखे जाणवते गडकरींना शंभर कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश नांदेडचे