नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास खुराणा ट्रॅव्हल्स पॉईंट ते रेल्वे स्टेशनकडे येतांना एका गाडीचालकाला ऱ्हदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्या चालकाचा मृत्यू झाला. पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची जाणिव चालकाने ओळखली आणि त्याने आपले गाडी रस्त्याच्या बाजूला रेल्वे हॉस्पीटलसमोरच्या मैदानात लावली. यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास खुराणा ट्रॅव्हल्स पॉईंट ते रेल्वे स्टेशनकडे एक चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.एक्स 1158 येत होती. या गाडीचे चालक शिवानंद जाधव (वय अंदाजे 35 ते 40) रा.तरोडा नाका नांदेड हे होते. त्यांना आपल्याला काही तरी त्रास होत आहे याची जाणिव झाली. त्यांनी रेल्वे दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आपली गाडी उभी केली आणि गाडी उभी करताच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या काही लोकांनी सांगितली. त्यानंतर पोलीस आणि बरेच लोक तेथे जमले आणि त्यांनी शिवानंद जाधव यांना दवाखान्यात नेले. परंतू त्यांचा दवाखान्यात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. प्राप्त माहितीनुसार त्यांना गाडी चालवतांना ऱ्हृदयविकाराचा झटका आला. पण त्याची चाहुल लागताच त्यांनी आपली गाडी मोकळ्या मैदानात उभी केली. त्यामुळे दुर्घटना काही मोठी दुघर्टना टळली. या संदर्भाची माहिती शिवानंद जाधव यांच्या कुटूंबियांना देण्यात आली. ते सुध्दा घटनास्थळी हजर झाले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
आम्हाला विचारल्याशिवाय फोटो कसे घेता-पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम
ही घटना घडली तेंव्हा योगा-योगाने एक पत्रकार तेथून जात होते. त्यांनी घडलेल्या प्रकाराचे फोटो घेण्यासाठी तेथे थांबले आणि पटकन काही फोटो घेतले. पत्रकाराची कृती वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी पाहिली. त्यांनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये त्या पत्रकाराकडे विचारणा केली की, फोटो कसे काय घेतले. तेंव्हा पत्रकार म्हणाले की, मी पत्रकार आहे बातमीसाठी फोटो लागतात असे सांगितले. यावर पोलीस निरिक्षक कदम यांनी त्यांना सांगितले की, आम्हाला विचारल्याशिवाय फोटो घ्यायचे नाहीत. पण पत्रकार आपल्या धार्मिक कार्यक्रमाच्या घाईत होते. म्हणून झटकन तेथून निघून आले.