नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2024 रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,055 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रचार विषयक सर्व परवानग्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना उद्यापासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात ४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत