नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘रेल सेवा पुरस्कार 2025’ वितरण सोहळ्याचे आयोजन 30 एप्रिल 2026 रोजी सायं. 16.00 वाजता रेल्वे इन्स्टिट्यूट, डी.ओ.सी. कॉम्प्लेक्स, हजूर साहिब नांदेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला मंडल रेल व्यवस्थापक प्रदीप कामले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अप्पर मंडल रेल व्यवस्थापक चि. कल्याण राजू हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वागत भाषण विभागीय कार्मिक अधिकारी/समन्वय श्रीमती रसना देवी यांनी केले. यावेळी ADRM श्री सी.एच. कल्याण राजू यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करत सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवासी सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी आपल्या भाषणात नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वांना प्रोत्साहित केले. या प्रसंगी विविध विभागांतील 23 कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी ‘रेल सेवा पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची नावे व पदनामे सोबत जोडली आहेत. या पुरस्कारांद्वारे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. केंद्रीय विद्यालय, नांदेड च्या विद्यार्थी नी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचा समारोप सहायक कार्मिक अधिकारी/नांदेड यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची नावे व पदनामे : 1. सुरज कुमार – Jr. Accountant, Sr.DFM/O/NED 2. मदने सुनील रामेशराव – Assistant Porter, NED 3. दिव्या मुथुलिंगम – JE/Track Machine, NED 4. गगन कालरा – SSE/P.Way, NED 5. फैजान रजा – SSE/P.Way, NED 6. हाके पंकज वासुदेव – TMTR-II, SSE/P.Way, PAU 7. मिथिलेश कुमार – Tech-II (Welder), SSE/P.Way, NED 8. कांबळे विजय कुमार – Technician Gr.I (EM), NED 9. अमर नामदेव कुंभाळकर – Tech Gr.III, TRD, NED 10. भगत सुमेध सिताराम – LP Goods (Elect.), NED 11. धर्मेंद्र सिंह – Sr. ALP (Elect.), NED 12. जंग बहादुर सिंह – LPP (Elect.), NED 13. सत्यम मेहरा – Sr. Stenographer Gr-I, DRM/O/NED 14. साहू ललितकुमार लक्ष्मीधर – Assistant, C&W, NED 15. प्रमोद मीणा – JE/Drawing, C&W 16. प्रशांत कुमार – Technician Gr.I (Fitter), PAU 17. सुनील कुमार मीणा – CHI, CPSN 18. आशुतोष कुमार प्रभाकर – SMR, NED 19. अश्वनी कुमार झा – TI/CHG, NED 20. मुकेश कुमार – Dy.CHC, NED 21. सावळे किरण सुरेश – Sr. Clerk, DPO/Co-ord./O/NED 22. पियुष पटेल – Technician Gr.II (S&T), NED 23. शेख जावेद – ASIP, ADB Kanthak Suryatal Post Views: 691 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत डीआयजी पथकाची मटक्यावर धाड अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या