नांदेड (प्रतिनिधी)- सांगवी परिसरातील जमिनीचा वाद वाढतच चालला आहे. याच वादातुन काँग्रेस नगरसेवीका आफिया नाज यांचे पती काजी नाफे यांच्या विरोधात शेतकऱ्याला अडवून, धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी नगरसेविका प्रतिनिधी काझी नाफे यांच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करून तक्रार केली होता यातील फिर्यादी प्रल्हाद शंकर कोकाटे यांची मौजे सांगवी बु. शिवारात गट क्र. ३३६ मध्ये ६५ गुंठे जमीन आहे. या जमिनीवर कोकाटे मागील काही महिन्यांपासून प्लॉटिंग करून विक्री करत आहेत. १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोकाटे आणि त्यांचा भाऊ आपल्या जागेवर थांबलेले असताना, प्रभाग क्र. ०२ चे नगरसेविका प्रतिनिधी काजी नाफे तिथे आले. त्यांनी ही जमीन स्मशानभूमीची असल्याचे म्हणत प्लॉटिंगच्या कामाला विरोध केला. वडिलोपार्जित जमीन असून ही नगरसेवक प्रतिनिधीने चुकीचा दावा केला आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केले. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत फिर्यादीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम २९९, ३२९(३) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असताना त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काझी नाफे यांनी केला आहे या गुन्ह्यात इतर ही व्यक्तींचा समावेश आहे का , या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 976 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उघड्यावर रंगला तीन पत्त्यांचा जुगार; पोलिसांच्या छाप्यात जुगारी जाळ्यात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची राज्यभर रेलचेल