नांदेड (प्रतिनिधी)- दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली राज्य शासनाने केली असून ती बदली त्वरित रद्द करावी. आणि अन्य मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आंदोलन केले आहे . सविस्तर वृत्त असे की दिव्यांगांना समाजामध्ये चांगले प्रकारे स्थान मिळावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काटेकोरपणे राज्य शासनाच्या योजना राबवून दिव्यांगांना न्याय दिला व बोगस दिव्यांगांना योजनेतून बाद केले आहे. बोगस दिव्यांग शाळेवरील शिक्षकांची चौकशी सुरू केली राज्य शासनाच्या सेवेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनाही चौकशी लावून बोगस प्रमाणपत्र धारक शोधून काढले अशा अधिकाऱ्यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली असून ती बदली त्वरित रद्द करा त्यांना त्याच पदावर तीन वर्ष ठेवा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील थकीत मानधन उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा . आमदार खासदारांचा निधी त्वरित खर्च करा जिल्हा नियोजन समितीकडील दिव्यांगाचा 1 टक्का राखीव निधी खर्च करा आजवर केलेल्या आंदोलनातील मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करा . आदी मागण्यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे. अमरदिप गोधने,चंपतराव डाकोरे, मिलिंद शीतळे,माधव हिवराळे. आतिक हुसेन, शिवराज बंगरवार. रवि कोकरे,कार्तिक कुमार भरतीपुरम, सय्यद आरिफ. शिवाजी सुर्यवंशी, नागनाथ कामजळगे, विकास साळवे. हसन खान इस्माईल खान, रमेश लंकाढाई, महंमद मोहसिन कादरी. नारायण ताडलवार.,मोहम्मद मोहसीन. शेख अलीम. मोहम्मद अब्दुल माजिद्द रजाक बागवान, साईनाथ काळे. महंमद शकील अहमद, जफर खान, संतोष रामशेटवार, संभाजी सुपारे, दिगंबर सोनटक्के, भोजराज शिंदे, नारायण नवले, मुकबधीर कर्णबधिर दिव्यांग संघटनासह भाग्यश्री नागेश्वर, अफरोजा खानम, कल्पना सकते, सविता गवते आदींसह हजारोंची उपस्थिती होती. राज्याचे माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्वरित मोबाईल वरून संपर्क करून दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी आंदोलनकर्त्यासमोर चर्चा करून बदली रद्द करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले Kanthak Suryatal Post Views: 727 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकर लाचलुचपत प्रकरणात अभियंता तुकाराम चौतमल यांना एक वर्ष सक्तमजुरी सह 10 हजार रोख दंड तिहेरी खून प्रकरण; दोन पोलीस अंमलदार निलंबित