नांदेड (प्रतिनिधी)-शहरात वाढत्या गँगवारच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची आणि सरकारी रुग्णालयात दोघांची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवत अरिजितसिंग चव्हाणवर हल्ला केला. त्यात सय्यद आवेज सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी,मोहमद अरबाज आणि इतर जण होते. धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात अरिजितसिग गजानन चव्हाण (वय २५ ) जागीच मरण पावला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद सय्यद खलीलआणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात नेले खात्री लायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरिजीत सिंगचा भाऊ प्रदीप चव्हाण चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय २७) वर आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय २३) वर दवाखान्यातील अपघात विभागाव जवळ अरिजीत सिंग च्या भावाने दोघांवर चाकूने हल्ला केला आणि ते गतप्राण झाले. हल्ला इतका भीषण होता की तिघांनाही बचावाची संधी मिळाली नाही.या प्रकरणात अरिजीतसिंग आणि त्याचे दोन मित्र सिनेमा पाहण्यासाठी आले होते त्यांच्यावर हल्ला झाला. प्रदीप चव्हाण चव्हाणने खून का बदला खून या न्यायाने दोन खून केले. असे सांगण्यात आले. या हल्ल्यातील शेख शाहरुख उर्फ कबुतर आणि साईलाला हे मुख्य आरोपी असल्याचे समजते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. ही घटना गँगवारमधील जुना वाद किंवा वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिघांवर एकाच वेळी समन्वय साधून हल्ला करण्यात आला असल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर बंद करून पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे. फॉरेन्सिक पथकाकडूनही घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नांदेड शहरात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे आणि ‘सिंघम’ अशी उपाधी मिळालेले अधिकारी कार्यरत असतानाही अशा प्रकारची तिहेरी हत्या घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरात गँगवार पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तिन्ही युवकांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आले असल्याने हल्ल्यामागे मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोरांची संख्या किती होती, त्यांचे नेमके उद्दिष्ट काय होते आणि या हत्येमागील सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे संकेतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या तिहेरी हत्येमुळे नांदेड शहर हादरले असून गँगवारचा वाढता प्रभाव रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हत्याकांडामागील संपूर्ण कट उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दवाखान्यातील छायाचित्र.. संबंधित व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-04-at-09.25.36.mp4 Kanthak Suryatal Post Views: 4,497 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आमचा एक पूल नष्ट केला आहे तर आम्ही आठ पूल पाडून बदला घेणार भविष्यात इराण पश्चिम आशियातील मोठी सामरिक शक्ती बनणार !