नांदेड,( जिमाका )- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड यांच्यावतीने “शासन आपल्या दारी” या संकल्पनेतुन लिडकॉम आपल्या दारी ही कार्यशाळा सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच लिडकॉम मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनातून नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात “लिडकॉम आपल्या दारी” कार्यशाळा सोमवार 11 मार्च 2024 रोजी संपन्न झाली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समतादूत बार्टी श्रीमती सुजाता पोहरे, रा.च. महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, अ.भा.गुरू रविदास समता परिषद संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लिडकॉम जिल्हा व्यवस्थापक अरूण राऊत, कर्मचारी सुनिल गोवंदे, दिपाली स्वामी, सुरेखा कांबळे यांची उपस्थिती होती. मोठया प्रमाणात महामंडळ स्वरोजगारासाठी कर्ज पुरवठा व शैक्षणीक कर्ज उपलब्ध आहे. महामंडळ स्वरोजगारासाठी कर्ज पुरवठा व शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत असल्याने चर्मकार समाजाने पुरेपुर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. तसेच तरूण पिढीला व्यवसायाकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन केले. महामंडळ व समाज बांधवांना सुवर्ण जयंती वर्षानिमित्त व संत रोहिदास महाराज यांच्या 647 व्या जयंती निमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा व्यवस्थापक अरूण राऊत यांनी प्रास्ताविकात महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती चर्मकार बांधवाना दिली. हे वर्ष महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी सुरू असल्याने यामध्ये लाभार्थ्यांना व्याज दरात कपात झाली असून मोठया संख्यने योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण राऊत यांनी केले. महामंडळाची उत्पादन केंद्र विक्री केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विका केंद्र प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे शंकर पवार यांनी शुभेच्छा देत महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त चांभार, मोची, ढोर, होलार युवक-युवती उमेदवारांनी मिळवून घ्यावा, असे सांगीतले. यानंतर महामंडळामार्फत कर्ज योजनेचे माहिती पत्रक व महामंडळाच्या दिनदर्शिका सर्व चर्मकार बांधवांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन आणि महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश हराळे यांनी केले. अरुण राउत यांनी सर्व प्रमुख पाहुण्याचे व चर्मकार बांधवाचे आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चर्मकार महिला व पुरूष उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,111 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Paypal Internet Online casino Most desirable 10 Paypal On line casino Online sites 2022 नांदेडमध्ये सोमवारी कव्वाली महोत्सव