लोहा (प्रतिनिधी)- : स्वस्तात सोने आणि गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नांदेड जिल्हा पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.न्यायालयाने त्या पोलीस अंमलदाराला आज पोलीस कोठडीत पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आलगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार सचिन बालाजी खेडकर (रा. खेडकरवाडी) यांना त्यांच्या नातेवाईक ओमकार भुरे यांनी ओळख करून देत स्वस्त दरात सोने मिळवून देतो तसेच गुंतवणुकीत मोठा फायदा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून खेडकर यांनी नातेवाईकांकडे मोठी रक्कम जमा केली.१७ जानेवारी २०२६ रोजी रात्री पार्डी येथील एका निर्जन बांधकाम ठिकाणी आरोपींनी तक्रारदारास बोलावून घेतले. तेथे ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन आरोपी पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेडकर यांनी लोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तपासादरम्यान समीर खान साबीर खान पठाण नेमणूक पोलीस ठाणे लिंबगाव बक्कल नंबर ४५५ हा या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी राजेश मुंढे असे दोघे पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान, २५ मार्च रोजी सुनील उबाळे नावाच्या व्यक्तीने पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून, कारवाई केल्यास न्यायालयात तक्रार करण्याची धमकी नासेर खान पठाण देत आहे अशी माहिती दिल्याचा प्रकारही उघड झाला. सुनील उबाळे अनेक प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करत असतात.त्यांचे वरच्या लोकांसोबत संबंध आहेत असे ते दाखवतात. तसेच एक बंधूकधारी सुरक्षा रक्षक असलेल्या केतन नागडा याच्या सोबत ते नेहमीच वावरतात. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,374 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर पार्किंगमुक्त होणार का?; वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह नांदेडमध्ये इंधन वितरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी