लोहा (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता लोहा येथील बैल बाजार मैदानात पार पडणार आहे.
लोहा तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) चे मन्मथ कल्याणकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
या शेतकरी मेळाव्याचे आयोजन ज्येष्ठ नेते तथा माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, योजना आणि शासनाच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
