इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला? इराणने दाखवली खरी ताकद;450 KG स्फोटकांसह हल्ला! डिमोना थरारलं, जगात तणाव वाढला
इराणने केवळ इशारे दिले नाहीत तर ते अक्षरशः कृतीत उतरवले आहेत. काल रात्री त्यांनी अरद सिटी आणि डिमोना या दोन शहरांवर इतक्या प्रचंड प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा केला की तेथील दृश्ये पाहताना अंगावर शहारे येतात. ढिगाऱ्याखाली दबलेल्या इमारती, जीवासाठी झगडणारी माणसं आणि त्यांना वाचवण्यासाठी धडपडणारी बचाव पथकं सगळं काही एका भयावह युद्धचित्रासारखं दिसत आहे.
डिमोना हे इस्रायलचं गुप्त न्यूक्लियर रिसर्च सेंटर असलेलं ठिकाण. त्या परिसरात झालेल्या विध्वंसामुळे काही इमारती अक्षरशः नकाशावरून पुसल्या गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. रात्रीपासून बचावकार्य सुरू असलं तरी अजूनही शेकडो लोक मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अरद शहरातील सर्व रुग्णालयं क्षमतेपलीकडे भरली आहेत. बाहेरून मदत बोलवण्याची वेळ आली आहे. या हल्ल्यात वापरलेली क्षेपणास्त्रं अर्धा टनापेक्षा अधिक स्फोटकांनी भरलेली असल्याने संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिमोना परिसरात, जिथे इस्रायलचे न्यूक्लियर सायंटिस्ट राहतात, तिथे थेट हल्ला करून इराणने स्पष्ट संदेश दिला आहे. इराणचे ब्रिगेडियर महसूद मुलानी यांनी उघडपणे दावा केला इस्रायलच्या आकाशावर आता आमचं वर्चस्व आहे. आम्हाला जिथे हवं तिथे आम्ही हल्ला करू शकतो.
विशेष म्हणजे, डिमोना परिसरात अत्यंत प्रगत एअर डिफेन्स सिस्टिम तैनात असूनही इराणी क्षेपणास्त्रांनी त्याला अक्षरशः धुडकावून लावलं. ज्या भागात पक्षीही उडू शकत नाही, तिथे क्षेपणास्त्रं घुसली हेच या हल्ल्याचं भयावह वास्तव आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही रात्र आमच्या देशाच्या इतिहासातील सर्वात काळी आणि भयावह रात्र होती.

दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने आधीच इशारा दिला होता आगीचा बदला आगीने, तेलाचा बदला तेलाने, आणि न्यूक्लियरचा बदला न्यूक्लियरनेच घेतला जाईल. कालचा हल्ला हा त्या इशाऱ्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी असल्याचं मानलं जात आहे. इराणने दावा केला की ते इस्रायलच्या न्यूक्लियर सेंटरवर थेट हल्ला करू शकले असते, पण त्यांनी जाणीवपूर्वक टार्गेट करून न्यूक्लियर सायंटिस्टना लक्ष्य केलं कारण इस्रायलनेही पूर्वी त्यांच्या शास्त्रज्ञांना लक्ष्य केलं होतं.
हा हल्ला इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. मृत आणि जखमींचा आकडा सतत वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे. इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिमही या हल्ल्यापुढे अपयशी ठरली ४५० किलो स्फोटक वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात ती निष्प्रभ ठरली.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातही मतभेद उघड होऊ लागल्याचं दिसत आहे. अमेरिकेने इराणवरील तेलविक्री निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असतानाच इराणने ठाम भूमिका घेत आम्ही विक्री करणारच नाही, असा स्पष्ट संदेश दिला. अब्जावधी डॉलर्सचा फायदा नाकारून इराणने स्वाभिमानाला प्राधान्य दिल्याचं ते सांगत आहेत. एकंदरीत, इराणने जशास तसं उत्तर देत इस्रायलला स्पष्ट इशारा दिला आहे आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका.

