“एक तत्त्वज्ञ गेला… पण विचार अजून जिवंत आहेत” आजच्या अस्थिर आणि अस्वस्थ जगात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्या जाण्याने केवळ एका देशाचे नव्हे, तर संपूर्ण मानवतेच्या विचारविश्वाचे नुकसान होते. अली लारी जानी हे असेच एक नाव एक तत्त्वज्ञ, एक विचारवंत, एक देशभक्त. त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ राजकारणच नाही तर तत्त्वज्ञान, नैतिकता आणि मानवी मूल्यांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या लिखाणात विशेषतः त्यांनी लिहिलेल्या पाच तत्त्वज्ञानाधारित पुस्तकांमध्ये मानवता, नैतिक धैर्य आणि आत्मसन्मान यांचा खोलवर विचार मांडलेला आहे. त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञांसह इम्मुल कान्ट यांच्यासारख्या गुंतागुंतीच्या विचारवंतांवर भाष्य करत, पूर्व आणि पश्चिम विचारधारेचा सेतू उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे एक वाक्य आजही मनाला भिडते “एक दिवस सिंहासारखे जगणे, शंभर दिवस शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.” हे वाक्य केवळ धैर्याचे प्रतीक नाही, तर आत्मसन्मानाच्या लढ्याचे घोषवाक्य आहे. आज जगात जे काही घडत आहे युद्ध, हिंसा, राजकीय स्वार्थ त्यात अनेकदा नैतिकतेचा अभाव जाणवतो. काही राष्ट्रे शक्ती आणि पैशाच्या जोरावर निर्णय घेतात, तर काही राष्ट्रे आपल्या मूल्यांवर ठाम राहून संघर्ष करतात. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या नेत्यांच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित होतात. इराणसारखा देश, ज्याने शतकानुशतके संस्कृती, गणित, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यामध्ये योगदान दिले, आजही आत्मसन्मानाने उभा आहे. ९४% साक्षरता, विज्ञान आणि गणितातील प्रगती, अवकाशात उपग्रह प्रक्षेपण हे सर्व त्यांच्या बौद्धिक सामर्थ्याचे द्योतक आहे. अली लारी जानी यांचे जीवन हे केवळ राजकीय नव्हते, तर अत्यंत साधेपणाचे होते. त्यांनी कर्ज घेऊन घर विकत घेतले, घरातील कामांमध्ये पत्नीला मदत केली, आणि एक सामान्य माणसासारखे आयुष्य जगले. त्यांच्या पत्नीच्या शब्दांत ते घरी नसले की घर रिकामं वाटतं ही भावना त्यांच्या मानवीतेची साक्ष देते. त्यांच्या मृत्यूने केवळ एक नेता गमावला नाही, तर एक विचारधारा हरवली. त्यांच्या सोबत अनेक निरपराध नागरिक आणि एक न्यूक्लिअर वैज्ञानिकही मृत्युमुखी पडलेही केवळ हानी नाही, तर मानवतेवरचा आघात आहे. इतिहासातही अनेक महान व्यक्तींनी अशा संघर्षांना विरोध केला आहे. अल्बर्ट आइनस्टाइन,महात्मा गांधीi आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या विचारवंतांनी शांतता, सहअस्तित्व आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला. इराण ही केवळ एक भूमी नाही, तर एक संस्कृती आहे एक विचार आहे. आणि अली लारी जानी यांसारख्या व्यक्ती त्या विचारांचे वाहक होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे— विचार कधी मरत नाहीत. तत्त्वज्ञान कधी नष्ट होत नाही. आणि आत्मसन्मानाची ज्वाला कधी विझत नाही. Kanthak Suryatal Post Views: 583 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रेल्वेकडून 140 टन ब्रेकडाउन क्रेनची संपूर्ण सुरक्षा मॉक ड्रिल पूर्ण राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ