मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी

निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

नांदेड :-मतदान करणे, मताधिकार बजावणे, निवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई आहे, हे सामान्यातील सामान्य नागरिकाला समजून सांगणे निवडणूक काळामध्ये स्वीप कक्षाचे काम असून एक कल्पकतेने पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज स्वीप (सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन ) उपक्रमासंदर्भात प्रचार प्रसार करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कवार,नोडल अधिकारी डॉ पंजाब खानसोळे,शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे,शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक पाचंगे,आनंदी वैद्य, प्रलोभ कुलकर्णी, राजेश कुलकर्णी साईनाथ चिद्रावार, लोककला तज्ञ डॉ.सान्वी

जेठवाणी यांच्यासह हजारो फॉलोअर असणारे समाज माध्यमातील सक्रीय सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते.

 

यावर्षी रांगा नाहीच प्रतीक्षालय असतील

यावर्षी उन्हामध्ये मतदानाला मतदारांना ताटकळत राहावे लागणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या संख्येतील मतदारांना सावली मिळेल व अन्य सुविधा मिळेल अशा पद्धतीचे प्रतीक्षालय उभारल्या जातील, याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

वेगवेगळ्या स्पर्धांची घोषणा लवकरच

यावेळी तरुण पिढीच्या आवडीनिवडींना लक्षात घेऊन समाज माध्यमांवर प्रचार प्रसार करणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणा स्वीप कक्षाकडून करण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक रील तयार करणे, समाज माध्यमांवरील लक्षवेधी पोस्ट तयार करणे, आकर्षक स्टेटस ठेवणे तसेच युवकांसाठी मोठ्या स्पर्धांची घोषणा जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच केली जाणार आहे.

प्रत्येक वस्तीमध्ये शंभर टक्के मतदान

या बैठकीत नागरिकांनी सुद्धा शंभर टक्के मतदानासाठी त्यांच्या काही भन्नाट आयडिया शेअर कराव्यात असे आवाहन करण्यात आले विशेषतः नव मतदार मतदान न करता आपले कर्तव्य बजावता या निवडणुकीत बाजूला राहू नये, याकडे लक्ष वेधण्याच्या आवाहन त्यांनी केले.

 

पारंपारिक लोककला माध्यमांचाही वापर

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पारंपारिक माध्यमांनी, वृत्तपत्रे व समाजसेवी संघटनांनी या कार्यामध्ये प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. रेडिओ,दूरदर्शन, वृत्तपत्रे, लोककला यांच्यासोबतच अन्य पारंपारिक माध्यमांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शाळकरी मुलांचे पालकांना आवाहन

विविध स्पर्धांच्या माध्यमातून, पत्र लेखनाच्या माध्यमातून आणि शाळेतील उपक्रमांच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आपल्या पालकांना आवाहन करणाऱ्या अनेक उपक्रमाची आखणी ही या बैठकीत करण्यात आली. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अहवाल आता मुले आपल्या पालकांना विविध उपक्रमातून करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!