मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; आरोपी अटक

नांदेड (प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील आलूर येथे बसवन्ना मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
        नागनाथ गंगाराम हाळदे (वय 60 वर्षे, व्यवसाय शेती, रा. आलूर ता. देगलुर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून  गंगाराम हानमेत गडम (वय 50 वर्षे, रा. आलूर ता. देगलुर) याने मंदिरात प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडले व दानपेटीत असलेली चिल्लर व नोटा असा अंदाजे 4,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी देगलुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 81/2026 नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 (ड) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार कनकवळे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!