फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे पथक 6 फेबु्रवारी रोजी गस्त करत असतांना एक चोरटा एटीएम मशीन फोडत असतांना रंगेहात पकडला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 6 फेबु्रवारी रोजी आपल्या पथकातील पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, शेख अजहरोद्दीन, अनिल बिरादार, शेख उमर आणि सुधाकर देवकत्ते हे गस्त करत असतांना गोदावरी बँकेच्या बाजूस असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये एक माणुस दिला. त्याची चौकशी केली असता तो बँकेचे एटीएम फोडून त्यातील रक्कम काढण्या प्रयत्न करत होता. सोबतच त्याला पकडल्यानंतर त्याने सांगितले की, कोटक महेंद्रा बँकेचे एटीएम देखील त्याने फोडले आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी नितीन मिसाळ आणि कोटक महेंद्रा बँकेचे अधिकारी दत्ता राजेगोरे यांनी दिलेल्यातक्रारीनुसार दोन वेगवेगळे गुन्हे पकडलेला आरोपी राम मोहन कुर्‍हे (26) रा.गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड ह.मु.श्रीनगर नांदेड याच्याविरुध्द दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी त्याच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक दुचाकी 1 लाख 6 हजार रुपये किंमीची जप्त केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!