नांदेड(प्रतिनिधी)-आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या 25 गाड्यांच्या ताफ्यातील एक गाडी ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर त्यातील ड्रायव्हरसह चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जखमी अवस्थेत आहे. हा अपघात रविवारी पहाटे 3 वाजेच्यासुमारास तुळजापूर टोल नाक्याजवळ घडला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड येथील काही यादव मंडळी 25 वेगवेगळ्या गाड्यांचा ताफा घेवून तुळजापूर येथील आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. रविवारी पहाटे 3.30 वाजता एम.एच.26 बी.सी.8286 या गाडीने तुळजापूर टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या एका ऊसाच्या ट्रक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात गाडीचा चालक, सोहन बालाजी कोतवाल, शिवराज हरीशचंद्र लंकाढाई आणि कृष्णा प्रल्हाद मंडले अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतील इतर एक प्रवाशी जखमी आहे. दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर असा दुर्देवी प्रसंग ओढावला याबद्दल नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.