नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपनीच्या दुकानात चोरी झाली असून 9 लाख रुपयांपेक्षा जास्तचा ऐवज चोरीला गेला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 33 हजार रुपये लंपास केले आहेत. अर्धापूर येथून 2 लाख 20 हजार रुपये किंमतीची एक कार चोरीला गेली आहे.
शिवदास कालीदास सूर्यवंशी हे बाटा या नामांकित वाहणांच्या दुकानात काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 फेबु्रवारीच्या रात्री 10 ते 27 फेबु्रवारीच्या सकाळी 8 वाजेदरम्यान कलामंदिर समोर असलेल्या बाटा दुकाना पाठीमागील चॅनेल गेट तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून बाटा कंपनीचे बुट, चप्पल, सॉक्स, बेल्ट आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख 12 हजार 138 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. वजिरबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे अधिक तपास करीत आहेत.
चैतन्यनगरमध्ये राहणारे शाहरुख खान युनूस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 फेबु्रवारीच्या दुपारी 4.30 ते 29 फेबु्रवारीच्या सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, किंमत 2 लाख 33 हजार रुपयांचे चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक गुरमे अधिक तपास करीत आहेत.
अर्धापूर येथील मारोती मंदिराजवळून 29 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजता एम.एम.26 बी.एक्स 4292 ही कार कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या कारची किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे. याबाबत निशिकांत बंडू अप्पा जडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अर्धापूर पेालीसांनी काल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार आडे हे करत आहेत.