नांदेड – बिलोली येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विनानंबरचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली. ही वाहने विनापरवाना व अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमएच 24 बीडब्लू 7727, एमएच 24 बीडब्लू 7227, एमएच 24 सीई 7227 एमएच 20 जीएस 0793 या वाहनाचा यात समावेश आहे. या सर्व वाहनावर दंड आकारण्यात आला असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात येऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, अवैध वाहतूक, विनानंबर किंवा बनावट नंबर असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. Kanthak Suryatal Post Views: 630 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मानव कल्याणासाठी विश्र्वशांती महायज्ञ-केदार जगद्गुरु यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर ; रमाई विचारमंच आणि रमाई जयंती मंडळ जवळा यांचा संयुक्त उपक्रम