नांदेड –’हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. गुरुद्वारा परिसरात प्रवेश करताच त्यांनी ‘बोले सो निहाल’च्या जयघोषात पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि.भाप्रसे) यांची उपस्थिती होती.
