उद्या नांदेड दाखल होतील
नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये साजरा होणार्या हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या सकाळी नांदेडला पोहचतील.
आपल्या पोलीस जीवनाची सुरूवात भारतीय पोलीस सेवेत आयपीएस हे पद प्राप्त केल्यानंतर डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी नांदेडमध्ये परिवेक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षकांचे पद सांभाळले होते. त्यानंतर त्यांना नांदेड शहर उपविभाग येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक ही पहिली नियुक्ती मिळाली होती आणि त्याच दरम्यान गुर-ता-गद्दी सोहळा झाला होता. त्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी गुर-ता-गद्दी सोहळ्याचा बंदोबस्त सांभाळला होता. या अनुभवाला लक्षात घेवून शासनाने सध्या पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथील प्रशासन विभागात नियुक्तीस असलेले विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांना नांदेडला पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ते उद्या सकाळी नांदेडला येतील आणि 24 आणि 25 जानेवारी रोजी होणार्या हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताचे प्रमुख पद सांभाळतील.
हिंद दी चादर या कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख डॉ.मनोजकुमार शर्मा
