नांदेड – जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. ‘कमवा व शिका’ या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांनी ‘आनंद नगरी’ या बाल महोत्सवाचे आयोजन केले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बालमहोत्सवानिमित्त जवळ्यात घेतलेल्या आनंदनगरी कार्यक्रमांतर्गत विविध दुकाने साकारून, व्यवसाय कसा करावा ? रुपये कसे जमा करावे ? विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री कशी करावी ? नफा कसा कमवावा? घेतलेल्या वस्तूची योग्य किंमत घेऊन बरोबर पैसे परत कसे द्यायचे? याचे ज्ञान ‘खरी कमाई’ म्हणजेच आनंदनगरी हा उपक्रम राबवितांना मुख्याध्यापक ढवळे जी. एस., प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून व्यावसायिकतेचे धडे दिले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या आनंद मेळाव्यात आप्पे, पाॅपकाॅर्न, गोळ्या बिस्किटे, चनाउसळ ,समोसा, केक, गुलाब जामुन, पोहे, बर्फी, पेरु, बोरं, वालाच्या शेंगा, चहा, पोहेचिवडा, मुरकुल, सोनपापडी, भेळ, पावभाजी, बालुशाही, तिळलाडू, मुरमुरे लाडू, शाबुवडे, लाह्या मुरमुरे, चाॅकलेट्स, खिचडी भजे, विविध प्रकारच्या खेळणी , विविध पुस्तकं वह्या पेन – पेन्सील, पाटी- खडू व विविध खाद्य पदार्थ घेवून विद्यार्थी व विद्यार्थिनी राजवर्धन गवारे, गणेश शिखरे, प्रियल गच्चे, अजिंक्य गोडबोले, विद्या गोडबोले, दीपक शिखरे, शिखरे, शिखरे, श्रुती गच्चे, विवेक गोडबोले, विश्वजीत गोडबोले, नागेश मठपती, प्रेम गोडबोले, विश्वदिप झिंझाडे, विराज हटकर श्रुती गच्चे, चरण सावंत, शैलेश मठपती, सुकेशना गच्चे, सिद्धांत गोडबोले आदी विद्यार्थ्यांनी विविध व्यवसाय करून अनुभव घेतला. ग्राहक म्हणून गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून चांगले व्यवसायिक म्हणून काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना शाळेच्या वतीने पारितोषिक देण्यात आले. तसेच वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवण देत असल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे कौतुकही केले.
