नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 9 पोलीस अधिकारी आणि 31 पोलीस अंमलदारांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी(पर्सनल सेक्युरीटी ऑफीसर) या प्रशिक्षणात भाग घेवून ते 37 दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यामध्ये पहिल्या पाच क्रमांकातील तीन जण नांदेड जिल्ह्यातील आहेत.
राज्य गुप्तवार्ता प्रबोधीनी पुणे येथे गेले 37 दिवस व्हीआयपी पर्सनल सेक्युरीटी ऑफीसर या कामासाठी प्रशिक्षण राबविण्यात आले. राज्यभरातून 9 पोलीस अधिकारी आणि 31 पोलीस अंमलदारांनी या प्रशिक्षणात भाग घेतला. लेखी, शारीरिक चाचणी आणि गोळीबार या तीन प्रकारांमध्ये या प्रशिक्षणार्थींची परिक्षा पुर्ण झाली. त्यामध्ये नांदेड येथील पोलीस निरिक्षक संतोष केंद्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक पोलीस अंमलदार प्रविण राठोड यांनी मिळवला. चौथा क्रमांक जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अंमलदार शंकर भारती यांनी मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई येथील दिपक सुरेवाड हे आहेत.
प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना राज्य गुप्तवार्ता प्रबोधीनीचे संचालक राजेंद्र डहाळे यांनी प्रमाणपत्रे दिली आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभकामना दिल्या. प्रशिक्षणपुर्ण झालेले हे सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे विशेष व्यक्तींच्या सुरक्षेत कार्यकरतात.