नांदेड –नांदेडच्या भीमघाट परिसरातील जेष्ठ नागरिक आमचे स्नेही पत्रकार विकास गजभारे यांच्या मातोश्री स्मृतीशेष गोदावरीबाई बळीरामजी गजभारे (वय-८० वर्षे) यांचे १८ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेड येथील सेवानिवृत्त एम्प्लॉयमेंट अधिकारी दिवंगत बी. एम. गजभारे यांच्या ‘त्या’ पत्नी, तर सेवानिवृत्त अप्पर कोषागार अधिकारी बी. बी. गजभारे, प्रा. डॉ. सुरेश गजभारे, प्रकाश गजभारे, पत्रकार विकास गजभारे तसेच विशाल गजभारे यांच्या त्या मातोश्री होत.
More Related Articles
कामठा खु. येथे 9 मार्च रोजी गुरु रविदास मंदिर भूमिपूजन कार्यक्रम !
नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील…
लाखो रुपयांच्या चोरीसाठी पोलीसांनी अदखलपात्र कलम जोडून गुन्हा दाखल केला
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यलक्ष्मी सहकारी बॅंकेचे किनवट येथील एटीएम मशीनच्या पासवर्डने उघडून त्यातून 17 लाख 39 हजार 500…
लातूर लोकसभेसाठी ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 5 मे रोजीची बस व्यवस्था
88-लोहा विधानसभा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध नांदेड- भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान…
