नागपूर(प्रतिनिधी)-नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी रश-24 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 225 किलो मिटर सायकल चालविण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघांनी दुहेरी गटात ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू यात सहभागी झाले होते. कोणत्याही माणसाने जिद्द आणि शिस्त आपल्या जीवनात वापरली तर वय त्यांच्यासाठी कधीच अडसर ठरत नाही. हे यातून दिसले.
नांदेड येथील डॉ.सुनिल कदम (55) आणि माजी सैन्य अधिकारी विलास पाटील (64) दोघे रा.काबरानगर नांदेड यांनी या रश-24 स्पर्धेत भाग घेतला होता. 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही स्पर्धा 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास सुरू होती. नागपूर येथे आयोजित रश-24 ही स्पर्धा टायगर गु्रप ऑफ नागपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. सावनेर ते नागपूर असा या स्पर्धेचे अंतर होते. 15 किलो मिटरचा संपुर्ण महामार्ग या स्पर्धेसाठी मोकळा करण्यात आला होता. 15 किलो मिटर जाणे आणि 15 किलो मिटर परत येणे असे 30 किलो मिटरचे अंतर यासाठी निर्धारीत करण्यात आले होते. सलग 24 तास सायकल चालवित जास्तीत जास्त अंतर पार करण्याचे आवाहन स्पर्धकांसमोर होते.
दुहेरी गटाच्या स्पर्धे डॉ.सुनिल कदम आणि विलास पाटील यांनी 24 तास सायकल चालवित 525 किलो मिटरचे अंतर पुर्ण केले आणि या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पोलंडसह अनेक देशांच्या स ायकलपट्टुुनी सहभाग घेतला होतो. त्यामुळे स्पर्धा अत्यंत आव्हाणात्मक ठरली. या परिस्थितीत सुध्दा नांदेडच्या ज्येष्ठ नागरीकांनी दाखवलेली मानसिक ताकत, शारिरीक क्षमता आणि अखंड संयम इतरांना सुध्दा प्रेरणादायी ठरला असेल. कोणत्याही ध्येयाला गाठण्यासाठी वय हे कधीच अडचण नसते. त्यासाठी जिद्द आणि शिस्त सोबत सकारात्मक जीवनशैली अंगीकारणारे व्यक्ती ईतिहास घडवितात. नांदेडच्या सर्व नागरीकांकडून आणि क्रिडा क्षेत्रातील चाहत्यांकडून डॉ.सुनिल कदम आणि विलास पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी सलग 24 तास सायकल चालवून 525 किलो मिटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला
