राजमाता मॉ जिजाऊ ह्या स्वराज्याच्या नियंत्रक होत्या तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे स्फूर्तीस्थान-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड –  मध्ययुगीन कालखंडात  सोळाव्या शतकात राष्ट्रमाता राजमाता, मॉ जिजाऊेंनी दोन छत्रपती घडविले आणि ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम या तत्वावर, सुत्रावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाप्रताप शाली, शुरविर, पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना बाळकडून देवून 18 पगड जाती-जमातींचे मावळे एकत्रित करून रयतेवर नियंत्रण ठेवून समर्पीत भावनेने रयत चालवून कार्य करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मॉ जिजाऊ ह्या स्वराज्याच्या नियंत्रक होत्या, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते  गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.12 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता राजमाता, राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब यांची 428 वी जयंती तर युग पुरूष, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात संयुक्तरित्या  जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  सर्व प्रथम रापम आगाराचे वाहतुक निरीक्षक मा.श्री. मयुर तेलंगे यांच्या हस्ते राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर चार्जमन मा.श्री.योगेश्वर जगताप यांच्या हस्ते युग पुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ते पुढे बोलताना प्रमुख वक्ते म्हणून गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी चला युवकांनो उठा कामाला लागा, जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत थांबनेही नाही आणि माघारही नाही, असे निक्षून त्याकाळी भारत देशातील युवकांना आदर्शयुक्त संदेश देवून राष्ट्रासाठी कार्य करा, असे सांगणारे, स्वामी विवेकानंद म्हणजेच युवकांचे स्फूर्तीस्थान होय, अशा या दोन्ही महान व्यक्तीमत्वांचा आदर्श घेवून आपण सर्वांनीच समाजप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे असेही ते शेवटी बोलताना आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन योगेश्वर जगताप, वाहतुक निरीक्षक मयुर तेलंगे, चार्जमन संदिप बोधनकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख संजय खेडकर, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सुरेश फुलारी, सौ.वैशाली कोकणे, सुनिता हुंबे, लक्ष्मी पाटोदेकर, यांत्रीक गोदावरी पंडीत, प्रियंका कांबळे, गोविंद तेलंग, यांत्रीक मयुर गायीकी, वैभव लोखंडे, अश्लेषा राठोड, प्रियंका कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी रामप आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!