नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी देगलूर नाका परिसरात एका चार चाकी वाहनात गोवंश जातीचे सहा बैल अत्यंत कु्ररतेने घेवून जातांना पकडले आहेत.
इतवारा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक रामेश्र्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार माधव गवळी, जावेद आदींनी दि.10 जानेवारी 2026 रोजी दुपारी देगलूर नाका परिसरात गस्त करत असतांना एम.एच.26 बी.ई.5322 मध्ये सहा जनावरे पाहिली जी अत्यंत वाईट अवस्थेत कु्ररतेने त्यात बांधलेली होती. पोलीसांनी सहा गोवंश जातीचे बैल आणि एक चार चाकी वाहन असा 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार माधव गवळी यांच्या तक्रारीवरुन या गाडीचा चालक शेख शाहेद शेख महेबुब (23) रा.इंदिरानगर अर्धापूर याच्या विरुध्द गुन्हा क्रमांक 11/2026 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार दुराणी यांच्याकडे देण्यात आला आहे.
इतवारा पोलीसांनी सहा गोवंश पकडले
