नांदेड(प्रतिनिधी)-22 डिसेंबर 2025 रोजी अपहरण झाल्यानंतर तक्रारीमध्ये आ.प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रविण पाटील चिखलीकर यांचे नाव असतांना सुध्दा आरोपी रकाण्यात त्यांचे नाव आले नाही. त्या संदर्भाने आज पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे महाराष्ट्र सचिव जीवन घोगरे पाटील यांनी आपले काही मुद्दे मांडले. त्यामध्ये त्यांच्यावर हल्ला करणारे आरोपी हे अनेकदा चिखलीकर कुटूंबियांसोबत फोटोमध्ये दिसत आहेत. सोबतच त्यांनी बोलतांना सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील वाल्मीक कराड म्हणजे आ.प्रताप पाटील चिलखीकरच आहेत.
आज जीवन घोगरे पाटील यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत 2 ऑक्टोबर 2025 रोजी जीवघेणा हल्ला झालेले संतोष एकनाथराव वडवळे हे सुध्दा हजर होते. आपली पार्श्र्वभूमी मांडतांना त्यांनी सांगितले की, आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठींब्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या कार्यवाह्या आणि बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रा बाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी मार्फतच चौकशी व्हावी. कारण मला नांदेड ग्रामीण पोलीसांच्या कामावर विश्र्वास नाही. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आ.प्रताप पाटील चिखलीकरांच्या गुंडांनी चार प्रकरणे घडवली. ती एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कशी घडली असा प्रश्न सुध्दा जीवन घोगरे पाटील यांनी उपस्थित केला.

आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात सांगतांना ईतिहासात मी सुरूवातीपासून राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचा निष्ठावंत आहे असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभुत झाल्यानंतर आ.प्रताप पाटील चिखलीकर यांना मीच अजित दादा पवार यांच्याकडे घेवून गेलो होतो आणि त्यांना पक्षात आणले. सोबतच कंधार-लोहा निवडणुकीच्या वेळेस सुदा मी भरपूर मदत केली. तसेच त्या दरम्यान माझ्या खात्यावर टाकलेल्या 25 लाख रुपयांपैकी 15 लाख रुपये मी त्यांचे स्वियसहाय्यक वाघ यांना रोख रक्कमेत दिले आणि 14 लाख रुपये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खर्च केला. विधानसभा निवडणुकीत आ.प्रताप पाटील निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री बनवा याचा आग्रह धरून मी स्वत: अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर तीन दिवस थांबलो होतो असे जीवन घोगरे पाटील म्हणाले. आ.प्रताप पाटील चिखलीकर आणि मोहन हंबर्डे यांनी माझ्या राजकारणाला संपविण्याचा प्रयत्न केला. तरी पण मी माझ्या निष्ठेप्रमाणे पक्षासोबत कायम राहिलो. या प्रसंगी जीवन घोगरे पाटील यांनी आर्थिक व्यवहाराची बाब चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी गुन्ह्यात अटक असलेल्या काही आरोपींचे फोटो चिखलीकर कुटूंबियांसोबत आहेत हे दाखवले.
यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, मी अंजनी दमानिया यांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की, वाल्मीक कराड बीडमध्येच नसून नांदेडमध्ये वाल्मीक कराडच्या रुपात आ.प्रताप पाटील चिखलीकर सुध्दा आहेत. मी सर्व वरिष्ठ नेत्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सर्वांनी नांदेड पोलीस अधिक्षकांना निष्पक्ष चौकशी करण्यास सांगितले आहे. माझा जबाब तीन दा बदलून फाडला. सोबतच माझ्या समर्थनार्थ आलेल्या लोकांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात लाठी चार्ज करण्यात आला. या संदर्भाने आता मी या प्रकरणाचा पाठपुरावा पुर्णपणे करणार आहे. कारण भविष्यात कोणी जीवन घोगरे पाटील किंवा संतोष वडवळे होवू नये यासाठी हे करणे आवश्यक आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे जीवन घोगरे पाटील म्हणाले.

