डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सहकार, कृषी व शिक्षणामध्ये मोठे योगदान-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – स्वातंत्र्य भारत देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून कार्य करतांना शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालये व कृषी विद्यापीठांची स्थापना आणि शाळांची निर्मिती करून सहकार क्षेत्रासहीत कास्तकार शिकला पाहिजे, खेड्या-पाड्यापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून या भारत देशासाठी मोठे योगदान देणारे महान व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ.पंजाबराव देशमुख उर्फ (उपाख्य)भाऊसाहेब देशमुख हे होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले, ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.27 डिसेंबर 2025 शनिवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता हरित क्रांतीचे प्रणेते, शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, डॉ.पंजाबराव देमशुख उर्फ (उपाध्यक्ष) भाऊसाहेब देशमुख यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सर्वप्रथम एसटी महामंडळ नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक मा.श्री.डॉ.चंद्रकांत वडसकर यांच्या हस्ते डॉ.पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते पुढे बोलताना मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, 7 फेब्रुवारी 1955 ला भारत कृषक समाजाची स्थापना करून राष्ट्रीय स्तरावर 1969 मध्ये 100 एकरात शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी प्रदर्शन भरविले. आज कृषी क्षेत्रात नवनवे असे नाविण्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान बदल होतात. ते याचेच धोतक आहे. म्हणून अशा या महान विभूतीचा तुम्ही-आम्ही युवा पिढीसहीत सर्वचजण या आधुनिक काळात त्यांचा आदर्श घेवून कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करून समाजाप्रती व देशाप्रती कार्य करणे ही काळाची गरज आहे, असेही मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी शेवटी बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून एसटी महामंडळ नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक मा.श्री.डॉ.चंद्रकांत वडसकर,  विभागीय वाहतुक अधिकारी कमलेश भारती, विभागीय लेखाकार देविदास जोगदंडे, विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलींदकुमार सोनाळे, विभागीय उप यंत्र अभियंता दिग्वीजय डी. नरंगले, वाहतुक निरीक्षक अनिल जाधव, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी,बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!