उमरी पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 33 पशुधन पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी उमरी, भोकर या वळण रस्त्याच्या बाजूला गायराण जमीनीत उभे असलेले 33 जनावर पकडले आहेत. त्यामध्ये गायी, कालवड, बैल, गोरे व हलगट यांचा समावेश आहे. या सर्व पशुधनाची किंमत 4 लाख 20 हजार रुपये आहे. हे सर्व जनावर अवैधरित्या कत्तलीसाठी पाठविले जाणार होते.
पोलीस अंमलदार अरविंद विठ्ठल हैबतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास उमरी पोलीस उमरी ते भोकर रस्त्यावर गस्त करत असतांना रस्त्याच्या शेजारी असलेल्या गोजेचा माळ येथील मोकळ्या गायरान जमीनीवर काही पशुधन दिसले. त्याची तपासणी केली असता 15 गायी, 9 कारवड, 2 बैल, 3 गोरे, दोन म्हशी आणि दोन हालगट अशी एकूण 33 जनावरे होती. ही सर्व जनावरे दोरीने झाडा बांधलेली होती आणि ही कत्तलीसाठी जाणार होती. या संदर्भाने पहाड गल्ली उमरी येथील शेख नबी शेख शादुल्ला याच्यासह इतर दोन जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 386/2025 दाखल करण्यात आला आहे. या 33 जनावरांची किंमत 4 लाख 28 हजार रुपये आहे.
ही कार्यवाही धर्माबादचे उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनात उमरीचे पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस उपनिरिक्षक सचिन आरमाळ, महेंद्रकुमार पोपलवार, पोलीस अंमलदार सुनिल कोलगुधे, कानगुलवार, अरविंद हैबतकर आणि शेख यांनी पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!