नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बोरगाव ता.लोहा येथे तीन जणांनी एका घरात घरफोडी करत 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच शहरातील रहेमानीया कॉलनी गाडेगाव रस्ता येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 69 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
झुंबरबाई सारंगधर घोरबांड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास मौजे बोरगाव (की) ता.लोहा येथील त्यांच्या शेताच्या बाजूला असलेले त्यांच्या घराचे कुलूप तोडून साईनाथ निळकंठे रा.कलंबर आणि इतर दोन व्यक्तींनी घरातील बॅगमध्ये ठेवलेले 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 289/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद फारुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 ते 12 डिसेंबरच्या सायंकाळी 7 वाजेदरम्यान त्यांचे गाडेगाव रस्त्यावरील घर बंद होते. ते कुटूंबासह निजामाबाद येथे गेले होते. या संधीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 69 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 1195/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 70 हजारांची चोरी; सोनखेडच्या हद्दीत 1 लाखाची चोरी
