विनायक सिंह कौशिकचा मृत्यू संशयास्पद; हैदराबाद लॉक अप मध्ये होत आहे चौकशी 

नांदेड  – ५ डिसेंबर रोजी पहाटे देगलूर नाका येथील शासकीय जनावरांच्या दवाखान्याच्या पटांगणात सापडलेल्या अनोळखी युवकाच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव विनायक सिंह उमरसिंह कौशिक (वय 25), रा. गाडीपुरा असे आहे. तो व्यवसायाने ऑटोचालक असल्याची माहिती समोर आली आहे.

पाच डिसेंबरच्या पहाटे मिळालेल्या माहितीप्रमाणे, विनायकचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता. घटनास्थळी केलेल्या प्राथमिक पाहणीत एक दात तुटलेला होता, उजव्या डोळ्याजवळ मार लागलेला, तसेच शर्ट फाटलेला आढळून आला. त्यामुळे हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

घटनेची नोंद इतवारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून करण्यात आली असली, तरी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, विनायक कौशिकच्या काही परिचितांची चौकशी हैदराबाद लॉक अप मध्ये सुरू आहे. तपास कोणत्या हैदराबाद लॉकअपमध्ये चालू आहे याची स्पष्ट माहिती मिळू शकली नसली, तरी संबंधित तपास यंत्रणांनी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.विनायकचा मृत्यू नेमका कसा झाला,तो दुर्दैवी अपघात होता की एखाद्या प्रकारचा घातपात,हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातमी …. 

अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!