नांदेड- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक फड, जोगदंड, माजी सरपंच साहेबराव शिखरे, अंकुश पाटील शिखरे, मारोती शिखरे, तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद गोडबोले, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, माजी अध्यक्ष किशनराव गच्चे, समता सैनिक दलाचे गुणवंत गच्चे, आनंद गोडबोले, केशव गोडबोले, मनिषा गच्चे, विलास गोडबोले, सूरज गोडबोले आदींची उपस्थिती होती.
रंगभरण चित्रकला स्पर्धेच्या सुरवातीला मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी पुष्प व धूप पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांनी रंगभरण चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन महामानवास अभिवादन केले. स्पर्धेचे आयोजनासाठी शालेय बालसभेच्या सोनल गोडबोले, तेजल शिखरे, मयुरी गोडबोले, अनन्या टिमके, सुप्रिया गच्चे, शाहेद शेख, सिद्धांत गोडबोले, विश्वदीप झिंझाडे, पिरखाँ पठाण, दीपक शिखरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
