नांदेड–तरुण पिढीचे प्रेरणास्थान,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कै.डॉ.शंकराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड येथे होणार आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर,विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.सुरेश सावंत हे उपस्थित राहणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मनपा आयुक्त महेश डोईफोडे,प्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरुण पिढी सुसंस्कृत व्हावी. जीवन जगण्याचा मुलमंत्र त्यांना मिळावा. त्याचबरोबर त्यांना यशोशिखर गाठण्यासाठी मौलिक मार्गदर्शन ठरणाऱ्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे लेखन सूरज गुरव यांनी केले आहे.महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पुरातन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे सूरज गुरव यांचे माझं गडप्रेम हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झालेले आहे.त्याची तिसरी आवृत्ती आता येत आहे.
या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बायफोकस पब्लिकेशन,पुणे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
