नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 88 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच माहूर येथे बसमध्ये प्रवेश करण्याच्या गर्दीतील एका महिलेचे 35 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांन चोरून नेले आहे.
यादव मारोती कोंडेवार यांनी दिलेल्यातक्रारीनुसार त्यांच्या घराचे शिवनगर येथील घराचे कोणी तरी चोट्यांनी 3 डिसेंबरच्या पहाटे 6.30 वाजेपासून ते 4 डिसेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान तोडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिणे आणि पितळी धातूची देवाची मुर्ती असा एकूणय 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 499/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
प्रमोद मारोतीराव चिवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 डिसेंबरच्या सायंकाळी 4 ते 4 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजेदरम्यान नरसी येथील त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा वाकवून कोणी तरी चोरट्यांनी आत प्र वेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिणे 48 हजार रुपयांचे आणि रोख रक्कम 40 हजार रुपयांची असा 88 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 392/2025 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
माहुरच्या सह्याद्री टी पाईंटवर दि.4 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास राधाबाई मारोती सुफले या 60 वर्षीय महिला गर्दीच्या वेळेस बसमध्ये प्रवेश करत असतांना गर्दीचा फायदा घेवून कोणी तरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेले आहे. या प्रकरणी माहुर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 208/2025 दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार मडावी करीत आहेत.
शिवनगरमध्ये घरफोडले; नरसीमध्ये घरफोडले; माहूरमध्ये महिलेचे मंगळसूत्र तोडले
