नांदेड(प्रतिनिधी)-हदगावमध्ये चालणार्या अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात एक पथक तेथे पाठविल्यानंतर त्यांनी तेथे दहा लोकांना पकडले असून त्यांच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या ठिकाणी संकेत दिघे या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना जबरदस्त अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. तरीपण अनैतिक व्यापार हदगावमध्ये सुरू होता.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना माहिती प्राप्त झाली की, हदगावमध्ये महिलांकडून बळजबरीने अनैतिक व्यापार करून घेतला जातो. या संदर्भाने तेथे छापा टाकून कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्यावर सोपवली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक चित्तरंजन ढेमकेवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले, पोलीस अंमलदार चव्हाण, नरवाडे, शिवभक्त, भिसे, बेग, कदम, महिला पोलीस अंमलदार इंदू गवळी, पांचाळ, यांना घेवून हदगाव गाठले. 4 डिसेंबरच्या रात्री 8 ते 10 या दोन तासांच्या वेळात अर्धापूर पोलीस पथकाने हदगाव शहरातील वाजपेयीनगर आणि तामसा रस्त्यावरील नई अबादी या दोन ठिकाणी छापे टाकले. या ठिकाणी अनेक महिलांकडून अनैतिक व्यापार करून घेतला जात होता. पोलीसांनी त्या ठिकाणी होट्या पत्ता चव्हाण (55), एक महिला (50 वर्षाची), विजय पुंजाराम काळबांडे (25), दुसरी एक महिला (वय 28) 40 वर्षाची एक महिला, शेख अन्सार शेख उस्मान(36), गोलगुंडा पत्ता चव्हाण, अजून एक महिला, शुभम परमेश्र्वर पदलवार, मारोती रामजी पदलवार अशा 9 जणांना पकडले. अर्धापूर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक चित्तरंजन ढेमकेवार आणि पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले यांच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 417 आणि 118/2025 असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास मात्र पोलीस निरिक्षक अजित कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे. सोबतच पोलीसांनी पाठविलेल्या प्रेसनोटमध्ये हदगावचे अत्यंत सिंघम सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक नंद, बरगे, पोलीस अंमलदार जुडे, शिवकंठे, पांचाळ, पाईकराव, गायकवाड यांचेही नाव कार्यवाही केलेल्या रकान्यात लिहिलेले आहे.
हदगावमध्ये चालणारा अनैतिक व्यापार उधळून लावण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या पथकाची कार्यवाही
