वेतन कपातीच्या आदेशानंतरही मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग
नांदेड(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी शिक्षकपात्रता परिक्षा सक्ती रद्द करण्यात यावी. किंवा या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी या मागणीसह अन्य काही मागण्या घेवून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी शहरातील महात्मा फुले पुतळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे शिक्षक यात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकत्तर कर्मचारी यांनी सामुहिक रजा टाकून मुक मोर्चात सहभाग नोंदवला. यात सर्वच शिक्षक संघटनाही या मोर्चात सहभाग नोंदवला. 1 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या शिक्षकांनी अद्यापही शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण नाही या शिक्षकांनी दोन वर्षात ही परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना नोकरीवरून पायउतार व्हावा लागणार अशा स्वरुपाचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या आदेशाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा राज्य शासनाने दिली नाही. याचबरोबर शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न घेवून 5 डिसेंबर रोजी राज्य भरात खाजगी शिक्षण संस्था, विनाअनुदानीत शिक्षक,जिल्हा परिषद शिक्षक यात सर्वच माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. हा मोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळामार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा धडकला
