आ.बोंढारकर यांना सक्षम ताटेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही वाटते

नांदेड(प्रतिनिधी)-सक्षम ताटेचा खून होवून आज आठवा दिवस आहे. उत्तर प्रदेशच्या नागीन मतदार संघाचे खासदार चंद्रशेखर उर्फ रावण सक्षमच्या कुटूंबियांच्या कुटूंबियांची विचारणा करतात. पण स्थानिक आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांना मात्र आपल्या मतदार संघातील या दुर्देवी घटनेची माहितीच मिळाली नाही की काय? अशी शंका यामुळे उत्पन्न होत आहे की, बहुदा सक्षम हा अनुसूचित जातीचा युवक होता. किंबहुना त्यांच्या आसपासच्या मंडळींनी त्यांना हे सुचवलेच नाही की, काय की आपणही तेथे जायला हवे. सक्षमच्या कुटूंबियांना धीर द्यायला हवा. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दि.27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या युवकाचा खून झाला. आंचलचे त्याच्यावरील प्रेम आज देशभरात विख्यात झाले. देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून अनेक लोक महिला, पुरूष, युवक, युवती रिल बनवून सक्षमच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करत आहेत आणि आंचलच्या प्रेमाचे कौतुक करत आहेत. आम्ही भारतीय ईतिहासात जोहर हा शब्द ऐकलेला आहे. आपल्या प्रेमासाठी अनेक पत्नीनी आपल्या पतीच्या मागे स्वत: जाळून घेवून आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या आहेत. पण आंचलने त्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली की, सक्षमच्या प्रेतासोबत लग्न करून सक्षमच्याच घरात राहुन त्याच्या आई-वडीलांना मी त्यांचा मुलगा म्हणूनच जगवेल असे सांगितले.
या सर्व भावना व्यक्त होत असतांना मात्र नांदेड दक्षीणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांना मात्र सक्षम ताटेच्या कुटूंबियांची भेट किंबहुना आंचलची भेट घेण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा त्यांना हे सांगितले जात नाही की, आमदारांनी सुध्दा तेथे जायला हवे. हजारो किलो मिटर दुर असलेल्या उत्तर प्रदेशच्या नागीन या मतदार संघाचे खासदार चंद्रशेखर उर्फ रावण यांनी व्हिडीओ कॉल करून ताटे कुटूंबियांशी बोलले आहेत, त्यांना धीर दिला आहे. वंचितच्या सौ.अंजितताई प्रकाश आंबेडकर सुध्दा ताटे कुटूंबियांना आणि आंचलला भेटायला आल्या होत्या. पण नांदेड दक्षीणचे आमदार मात्र अद्याप आलेले नाहीत.सध्या आमदार आनंदराव पाटील बोंढारकर हे नांदेड दक्षीण मतदार संघात उपस्थित आहेत. काही उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतल्याचे फोटो उपलब्ध आहेत. पण सक्षमच्या घरी मात्र यायला वेळ मिळाला नाही. काय कारण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे की, सक्षम हा अनुसूचित जातीचा युवक होता म्हणूनच आमदार साहेब त्यांच्या कुटूबियांना भेटायला आले नाहीत आणि हे खरे असेल तर खरेच जातीयवाद संपला काय? उगीचच व्यासपीठावर खोट्या गप्पा मारून आम्ही जाती, पाती मानत नाही. भारतीय संविधानाचे आम्ही पाईक आहोत असे म्हणणे म्हणजे नुसता पोकळपणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!