विद्यार्थ्यांनो यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका-ना. माणिकराव कोकाटे

२७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- खेळामध्ये हार-जीत असतेच. सातत्याने आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते पण. आपल्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याने तीळभर जरी जास्त मेहनत घेतली असेल तर पराजय स्वीकारावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो यश भेटल्यास कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीच खचून जाऊ नका, असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या मा. राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत पुरस्कृत २७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते.


पुढे ते म्हणाले, लवकरच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे जलतरण उभारण्यासाठी सर्वोत्तपरी आदेशित करणार आहे. राज्य शासनातर्फे खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी मूलभूत सुख-सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासन कट्टीबद्ध आहे. नोकरीत खेळाडूंना सध्या पाच टक्के आरक्षण आहे ते लवकर दहा टक्के करण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. क्रीडा धोरण लवकरच अद्यावत करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी नांदेड दक्षिणचे आ.आनंदराव पाटील बोंढारकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, लंगरसाहेब गुरुद्वारा, नांदेडचे संत बाबा बलविंदरसिंघजी महाराज, शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे, शिवराज पाटील होटाल  कर, स्वागताध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, निरीक्षण समितीचे अध्यक्ष दापोली येथील डॉ. अरुण माने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सचिन देशमुख आणि मुंबई येथील आदित्य कुलकर्णी, मुंवई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ.पराग खडके, डॉ.चंद्रकांत बाविस्कर, वित्त व लेखाधिकारी डॉ.पराग भालचंद्र, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांच्यासह इत्तर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी क्रीडा महोत्सवाबाबत आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा महोत्सावाचे प्रास्ताविक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांनी केले. यावेळी स्वागताध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे, आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन, क्रीडा महोत्सव व विद्यापीठ ध्वजारोहण, मशाल पेटवून, राज्यगीत व विद्यापीठ गीताने झाला, तर सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी मानले. यावेळी विविध विद्यापीठाचे क्रीडा संचालक, व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच आणि मुले-मुली खेळाडू यांच्यासह क्रीडा प्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!