रोटेशनच्या नियुक्तीला आपली शौर्यगाथा सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थोडीशी लाजही वाटली नाही

जच्या परिस्थितीत कोणी सांगितले की काल रात्री अयोध्येत स्वतः प्रभू श्रीराम आले आणि लोकांशी संवाद साधून गेले, किंवा कोणी म्हणाले की कालच मी दिलीप कुमारसोबत नवीन सिनेमा करण्याचा करार केला, तर आपण हसून सोडून देऊ  कारण आपण विज्ञानयुगात जगतो.पण एखाद्या संवैधानिक संस्थेच्या प्रमुखाने अशी हास्यास्पद विधानं केली, तर ते केवळ विचित्र नाही,तर धोकादायक आहे.

ही भूमिका स्पष्ट करून आम्ही तुम्हाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा प्रकार सांगत आहोत. त्यांचा ४२ सेकंदांचा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची थेट अब्रू घालून गेला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आम्ही इथे देत आहोत.ज्ञानेश कुमार आपल्या व्हिडिओमध्ये सांगतात की त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर “पारदर्शक आणि सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेसाठी” असलेल्या IDEA (I D E A) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

मात्र, या संदर्भात X (पूर्वीचे ट्विटर) वर संजीव गुप्ता लिहितात की:

“नागेश कुमार जी, मोठमोठ्या गोष्टी करून स्वतःची वाहवा करून घेऊ नका. तुम्ही सांगता ते सत्य नाही. ही नियुक्ती रोटेशन पद्धतीने होत असते. 2007 आणि 2018 मध्येही भारताकडे हे पद होते. त्यामुळे तुमच्या ‘कामगिरी’मुळे काही विशेष झालेले नाही. तुमच्या नियुक्तीचा क्रमांक, नियमावली सर्व इंटरनॅशनल आयडिया रूल्स ऑफ प्रोसिजरमध्ये स्पष्ट आहे. यात तुमच्या शौर्याची गाथा कुठेच नाही.”

IDEA या संस्थेची रोटेशन लिस्टही आता उघड झाली आहे.  ज्यात 2026 मध्ये भारताला अध्यक्षपद मिळणार आहे असे स्पष्ट लिहिले आहे. 2008 मध्येही भारताकडे ते होते. 2033 पर्यंत कोणत्या देशांना अध्यक्षपद मिळणार, याची यादी तयार आहे: 2017 – दक्षिण आफ्रिका, 2018 – फिलिपिन्स, 2019 – (…), 2030 – पोर्तुगाल, 2021 – मंगोलिया, 2032 – नामिबिया, 2033 – ट्युनिशिया… ही सगळी यादी आधीपासून तयार आहे.

मग अशा परिस्थितीत “माझ्या कामाला पाहून माझी नियुक्ती झाली आहे” असे ज्ञानेश कुमार सांगतात हे किती हास्यास्पद! खोटे बोलतानाही त्यांना लाज वाटली नाही, हे आश्चर्यकारक आहे. ज्या संस्थेचे अध्यक्ष 2033 पर्यंत ठरलेले आहेत, त्यात मी स्वतःच्या गुणवत्तेवर पोचलो असे सांगणे म्हणजे आपल्याच पाठीवर आपल्याच हाताने थाप मारून घेण्याचा भोंदू प्रकार आहे.रोटेशन पद्धतीने मिळणाऱ्या पदाला “मोठी उपलब्धी” असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न फोल, पोकळ आणि दिशाभूल करणारा आहे.भारताचा निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या वादळात अडकलेला असताना “मी किती महान आहे” असे दाखवण्याचा हा प्रयत्न लाजिरवाणा आहे.

ज्ञानेश कुमार यांनी दाखवलेल्या माहितीनुसार असे वाटण्यासारखे वातावरण ज्ञानेश कुमार तयार करतात की जणू IDEA संस्थेतील सर्व देशांनी त्यांच्या कामामुळे त्यांना हे पद दिले!पण वास्तव वेगळे आहे—हा दावा सपशेल खोटा आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर खोटे बोलणे किती लाजिरवाणे असते, हे याने पुन्हा सिद्ध झाले.

 

G20 च्या वेळीही असेच खोटे पसरवले गेले होते की, नरेंद्र मोदी यांच्या ‘जगद्गुरू’ छबीमुळे भारताला अध्यक्षपद मिळाले.परंतु ते पदसुद्धा रोटेशननेच मिळते.
त्या यादीमध्ये व्यक्ती नसतात. देशांचे नाव असते. सगळी कागदपत्रे तयार असताना खोटे दाखवण्याचा हा प्रवाह म्हणजे, आता भारतात खोटे बोलण्याची सवयच पडली आहे, असेच म्हणावे लागेल.

याच धाटणीने, काही दिवसांपूर्वी शेतकरी पुत्र आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभेत सांगितले की, “बाबरी मशिद बांधण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शासकीय खजिन्यातून पैसे देण्याची तयारी दाखवली होती.”

परंतु इतिहासतज्ज्ञ रुचिका शर्मा स्पष्ट सांगतात: अशा प्रकारचा कोणताही पुरावा नाही.
इतिहासतज्ज्ञ इरफान हबीब म्हणतात:
“राजनाथ सिंह यांचे वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे आहे. एका रक्षा मंत्र्याला हे शोभणारे नाही.”
इरफान हबीब यांचे मागे देवी सरस्वती यांचे चित्र दिसत होते,म्हणजे त्यांच्या मनात ज्ञानदेवीचा आदर आहे.पण शेतकरी पुत्र राजनाथ सिंह मात्र सपशेल खोटे बोलतात, हे कसे समजायचे?

इतिहासाच्या पुस्तकांतून मुघलांना गायब केले जात आहे.नव्या पिढीला शत्रुत्वाचा इतिहास शिकवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा म्हणले होते की, “एलोरा ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांना तिथे उभारायला हवे होते.”
पण ज्या वर्षाचा त्यांनी उल्लेख केला—त्या वर्षाच्या आधीच पटेल यांचे निधन झालेले होते.इतका निष्काळजी दावा देशाच्या पंतप्रधानांकडून? 
इतिहासाला शस्त्र बनवून, त्या बनावट शस्त्राने आजचे राजकारण चालवण्याचा हा घाणेरडा प्रकार आता थांबायलाच हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!