सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद
नांदेड–शहरातील देगावचाळ भागात युवा नेते बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून त्रिपीटक बुध्दविहार स्थापन केले असून दि.30 नोव्हेंबर रोजी बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्दविहार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले हे होते. या सोहळ्यानिमित्त सुप्रसिध्द गायक काळजावर कोरले नाव फेम अजय देहाडे यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
भैयासाहेब आंबेडकरनगर देगावचाळ या भागात मागील अनेक दिवसांपासून बौध्दविहाराच्या कामासाठी बंटी लांडगे यांनी पुढाकार घेतला होता. मागील 30 ते 35 वर्षापासून हे काम प्रलंबित होते. बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून या कामास सुरूवात करून काम पूर्णत्वास नेले. काम पूर्ण झाल्यामुळे सदरील कामाचा उद्घाटन सोहळा व बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा करण्यासाठी बंटी लांडगे यांनी पुढाकार घेत भव्य-दिव्य असा सोहळा दि.30 रोजी पार पडला. पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते बुध्द मुर्तींची प्रतिष्ठापणा व बुध्दविहाराचे उद्घाटन पार पडले. शिलरत्न भन्ते व भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती. खा. रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, उपमहापौर शिला कदम, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलबाई लांडगे, उपमहापौर आनंद चव्हाण, दै.लोकपत्रचे आवृत्ती संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रभागामधून भव्य बुध्दमुर्ती रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो बौध्द उपासक, उपासिका यांची हजेरी होती. सायंकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांचा भिमगिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्रिपीटक बुध्दविहार समितीचे चांदू पंडीत, अशोक हिंगोले, भालचंद्र गवाले, दिपक पंडीत, सुदर्शन राजभोज, देवराव गोडबोले, सुरज राजभोज, महेंद्र गोडबोले, विलास कोकरे यांच्यासह बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाने परिश्रम घेतले.
सार्या समाजाला घेवून चालतो असा हा दिलवाला आला… आला… बंटी लांडगे
त्रिपीटक बुध्दविहार मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्याच्या कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांनी काळजावर कोरले नाव यासह सार्या समाजाला घेवून चालतो असा हा दिलावाला आला-आला बंटीभाऊ आला हे गित गाताच उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष करत बंटी लांडगे यांचा जयघोष केला.
