नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत वाशीम जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटनेतर्फे आयोजित २२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर (कनिष्ठ गट) धनुर्विद्या स्पर्धा पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन ३१ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही निवड चाचणी आर्चरी स्कूल, श्री गुरु गोबिंदसिंहजी स्टेडियम, नांदेड येथे सकाळी ११ वाजता होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संघटना सचिव तथा प्रशिक्षिका वृषाली पाटील-जोगदंड यांनी केले आहे.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेतर्फे १ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशीम येथे राज्यस्तरीय मुलगे-मुली ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नांदेड संघाच्या निवड चाचणीत इंडियन, रिकर्व व कंपाऊंड या तीन प्रकारांमध्ये मुलगे व मुली यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील अंतर खालीलप्रमाणे असेल –
-
इंडियन राऊंड : ४० मीटर व ३० मीटर
-
रिकर्व राऊंड : डबल ७० मीटर
-
कंपाऊंड राऊंड : डबल ५० मीटर
राज्य स्पर्धेसाठी ड्रेस कोड अनिवार्य असणार असून खेळाडूंनी भारतीय आर्चरी संघटनेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह व योग्य क्रीडा गणवेशासह ३१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आर्चरी स्कूल, श्री गुरु गोबिंदसिंहजी स्टेडियम, नांदेड येथे उपस्थित राहावे.
हे आवाहन डॉ. हंसराज वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष हरविंदरसिंग संधू, श्रीनिवास भुसेवार, मुन्ना कदम कोंडेकर, सुरेश तमलुरकर, शिवाजी पुजरवाड, मालोजी कांबळे, सिद्धेश्वर शेटे आणि राष्ट्रपाल नरवाडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा संघटना सचिव वृषाली पाटील-जोगदंड यांच्याशी
मो. ९४०४६६२३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
