नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलीस सेवा काळात वरिष्ठांना दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी पोलीस अधिक्षकांनी शिफारस केल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षकांनी एक वर्षाच्या वेतनवाढ बंदीची शिक्षा दिली. त्या पोलीस उपनिरिक्षकाच्या हातात आता इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आले आहे. ते कसे आले याचा शोध होईल. परंतू तेथे जुन्या कलेक्टरसोबत त्यांचा वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली असून पोलीस उपनिरिक्षकाने रातोरात तुम्हाला गायब करील अर्थात तुमच्या बदल्या करील अशी समज पोलीस अंमलदार यांना दिली खरी पण त्याचा परिणाम इतर पोलीस अधिकाऱ्यांवर सुध्दा होत असल्याची चर्चा आहे.
अनेक कारणांनी वादातीत असलेले पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण हे सलग 4 वर्ष कोण्याचेही आदेश नसतांना तोंडी आदेशाच्या नावावर स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत होते. तेथे तर त्यांची चलतीच होती. अखेर त्यांची बदली गुरुद्वारा सुरक्षा पथकात करण्यात आली. या दरम्यान त्यांच्याविरुध्द स्थानिक गुन्हा शाखेतील शासकीय गाड्यांच्या वापरासंदर्भाने पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्याकडे अर्ज केला असतांना त्याची संपुर्ण तपासणी करून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी परमेश्र्वर चव्हाण यांनी बऱ्याच बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लपवल्या आहेत, बाहेर जिल्ह्यात जातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही अशा आशयाचा अहवाल पाठविल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परमेश्र्वर चव्हाणला एक वर्ष वेतनवाढ बंदीची शिक्षा ठोठावली. पण दरम्यान त्यांनी गुरुद्वारा सुरक्षा पथकातून आपली बदली इतवारा पोलीस ठाण्यात करुन घेतली.
इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्याची जागा रिकामी झाल्यानंतर काही तरी जुगाड करून परमेश्र्वर चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाच्या जागेवर नियुक्तीचे आदेश मिळवले. हा आदेश मोदकांच्या प्रभावाचा आहे असे बोलले जात आहे. मोदकांची संख्या मात्र कळली नाही. ही नियुक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या जुन्या कलेक्टरसोबत परमेश्र्वर चव्हाण यांचा वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. तेंव्हा परमेश्र्वर चव्हाण यांनी तुम्हाला रातो रात गायब करील, मी सांगितलेलेच होणार अशा स्वरुपाची सुंदर शब्दातील समज पोलीस अंमलदारांना दिली. पण याचा परिणाम इतर अधिकाऱ्यांवर सुध्दा होत आहे. परमेश्र्वर चव्हाण यांचे पद पोलीस उपनिरिक्षक आहे पण त्यांच्या पेक्षा मोठे पद असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सुध्दा परमेश्र्वर चव्हाण यांचे बोलणे सुचक आहे.
पीसीआय परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्या हातात आता इतवारा गुन्हे शोध पथक
